नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-०५ आणि सक्करदरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विहीरगाव येथील गारगोटी नाला परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, छोटा ताजबाग परिसरातील गोंड बस्ती जवळील रघुजीनगर भागात दोन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृतांची ओळख आदित्य उर्फ सोनू बोडवे आणि दादू उर्फ आदित्य राहुलकर अशी झाली आहे. दोघांचेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृतक आणि आरोपी हे सर्वजण एका फळ दुकानात काम करत होते. सुमारे महिनाभरापूर्वी दुकानातील सुरक्षा रक्षकासोबत मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याच्या आरोपावरून दोन्ही मृत तरुणांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर ते वारंवार मद्यप्राशन करून दुकानात येत गोंधळ घालत असल्याने इतर कर्मचाऱ्यांशी त्यांचे वाद सुरू होते.
घटनेच्या दिवशीही याच कारणावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद काही वेळातच हिंसक स्वरूप धारण करत आरोपींनी विटा, दगड आणि धारदार चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा आणि सक्करदरा पोलिसांनी तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर वैभव उर्फ दादू प्रदीप डोंगरे, वेदांत उर्फ डब्बा अजय डबीर आणि अभिषेक उर्फ तात्या उत्तम राऊत या तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील चौकशीसाठी त्यांना सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात फळ दुकान मालकासह अन्य काही संशयितांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतक आणि आरोपी या दोघांचाही पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचेही तपासात समोर आले आहे.
सध्या पोलिसांकडून या दुहेरी हत्याकांडाचा सखोल तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज
विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate





