Published On : Tue, Dec 16th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपा निवडणूक; भाजप म्हणते ‘तारीख ठरली, फक्त गुलाल बाकी’ तर काँग्रेसची तयारी ‘शून्य’!

Advertisement

नागपूर: आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे, पण भाजपने निवडणूक रणभूमीत युद्धपातळीवर तयारी करत आपली सत्ता पुन्हा मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या बाजूला, काँग्रेस पक्षाकडून पूर्ण निष्क्रियता आणि उदासीनता पाहायला मिळतेय. या निष्क्रियतेमुळे काँग्रेसचा नागपूरमधील राजकीय अस्तित्व धोक्यात आले असून पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता दिसून येते.

भाजपची रणनीती: संघटनात्मक ताकद आणि विजयाचा विश्वास-

Gold Rate
17 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900/-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 2,01,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपने प्रत्येक स्तरावर प्रभावी नियोजन आखले आहे. विधानसभा क्षेत्रांनिहाय प्रभारी नेमले गेले असून प्रभाग पातळीवरही काटेकोर संघटनात्मक कामगिरी सुरू आहे. उमेदवारांच्या निवडीपासून ते सोशल मिडिया, महिला, युवक तसेच कायदेशीर युनिटपर्यंत सर्व यंत्रणा युद्धासाठी सज्ज आहेत. ही व्यापक तयारी भाजपच्या विजयाचा शंखनाद ठरत आहे. पक्षाचे नेतृत्व खुल्या मनाने यशाची खात्री व्यक्त करत असून, नागपूर महापालिकेवर आपली पकड अधिक मजबूत करण्याचा इरादा स्पष्ट आहे.

भारतीय जनता पक्षाने सोमवारी शहरातील विधानसभा क्षेत्रनिहाय प्रभारी नियुक्ती केली आहे. भाजपसाठी नागपूर शहराचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन करण्यात येत असून, पूर्व, पश्चिम, दक्षिण-पश्चिम, मध्य आणि दक्षिण नागपूरसाठी प्रभारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सहा विधानसभा मतदारसंघांपैकी उत्तर नागपूरचा प्रभारी अजूनही निश्चित होऊ शकलेला नाही.

पूर्व नागपूरसाठी प्रा. अनिल सोले, पश्चिम नागपूरसाठी प्रा. राजेश बागडी, दक्षिण-पश्चिम नागपूरसाठी आमदार प्रवीण दटके, मध्य नागपूरसाठी माजी आमदार गिरीश व्यास, तर दक्षिण नागपूरसाठी भोजराज डुंबे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपला प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे या भागासाठी नेमणूक थांबवण्यात आली आहे. यापूर्वी प्रभारी म्हणून नेमलेल्या नेत्यांनी माघार घेतल्यामुळे उत्तर नागपूर भागासाठी निर्णय उशिरा होत आहे.

त्याचबरोबर महापालिका निवडणूक संचालन समितीचीही घोषणा करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांना सोपवण्यात आले आहे, तर आमदार प्रवीण दटके यांच्याकडे निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक प्रमुख म्हणून प्रा. संजय भेंडे, सहप्रमुख विष्णू चांगदे, जाहीरनामा प्रमुख माजी आमदार गिरीश व्यास व गिरधारी निमजे यांची निवड करण्यात आली आहे.

राजकीय चर्चा प्रमुख म्हणून धर्मपाल मेश्राम व रमण सेनाड, भाषण मुद्दे प्रमुख म्हणून श्रीकांत देशपांडे, आकडेवारी प्रमुख म्हणून विनायकराव डेहनकर व देवेन दस्तुरे, विशेष संपर्क प्रमुख म्हणून जयप्रकाश गुप्ता व विरेंद्र कुकरेजा, सामाजिक संपर्क प्रमुख म्हणून अविनाश ठाकरे व रामभाऊ आंबूलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला संपर्क प्रमुख म्हणून मनीषा धावडे, अर्चना डेहनकर व कल्पना पांडे, तर युवा संपर्क प्रमुख म्हणून सचिन करारे, शिवाणी दाणी व बादल राऊत यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

भाजपच्या या नियोजनातून नागपूर महापालिका निवडणुकीत जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसून येत असून, उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघासाठीही लवकरच प्रभारी नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे.

काँग्रेसची निष्क्रियता: पक्षाअंतर्गत वाद चव्हाट्यावर-

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये विरोधाभासाचं चित्र दिसत आहे. नागपूरमधील प्रमुख नेते विकास ठाकरे, नितीन राऊत, अभिजीत वंजारी, सुनील केदार यांसह इतर बऱ्याच नेत्यांनी निवडणूक संदर्भात कुठे आहेत, कोणती रणनीती आखत आहेत याचा पुरेपूर पुरावा नाही. पक्षात कुठलीही संघटनात्मक हालचाल दिसत नसल्याने त्यांचे मतदार आणि समर्थकही खंतित आहेत. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर काँग्रेसने गेला अपयश फक्त पक्षाची छवि खराब करत आहे.

निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता –

काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे पक्षाला केवळ मतदारांचा त्रास नाही तर विरोधकांकडून ईव्हीएम, बनावट मतदार आणि निवडणूक आयोग भाजपच्या हातात असल्याचे आरोपांची शृंखला उभी झाली आहे. ही आरोपं पक्षाच्या कमकुवत नेतृत्वाची, निष्क्रियतेची आणि दृष्टीकोनातील मोठ्या कमतरतेची चिन्हं आहेत. या सगळ्यामुळे काँग्रेसच्या मतदारांमध्ये अस्वस्थता वाढत असून, पक्षासाठी नागपूरमध्ये राजकीय धावपळ थोडीशी थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न आणि भाजपचा विजयाचा दावा-
नागपूर महापालिकेची निवडणूक ही फक्त स्थानिक शासकीय लढत नसून काँग्रेसच्या अस्तित्वासाठी एक मोठा प्रश्न ठरली आहे. भाजपची तीव्र तयारी आणि रणनीतींच्या जोरावर विजय निश्चित करण्याचा मनसुबा असून, काँग्रेसने आपले काम वेळेत न केल्यास या निवडणुकीत पक्षाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे काँग्रेसने या आव्हानाला त्वरित सामोरे जावेच लागेल, अन्यथा या रणभूमीवर पक्षाच्या राजकीय भविष्याला मोठा धक्का बसणार आहे.नागपूर महापालिका निवडणूक: काँग्रेसची निष्क्रियता वादात, भाजपची सज्जता स्पष्ट सत्ता बदलणार की कायम राहणार? हे पाहावे लागेल.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement