
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत आज मतदानाचा हक्क बजावला. महाल येथील चिटणीस पार्क परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूल येथील मतदान केंद्रावर त्यांनी परिवारासह उपस्थित राहून मतदान केले.
मतदानानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधत लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “निवडणूक ही लोकशाहीची ताकद असून प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार नक्की बजावावा,” असे आवाहन त्यांनी केले. नागपूर शहराच्या विकासासाठी योग्य आणि सक्षम प्रतिनिधी निवडण्याची ही संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मतदान केंद्रावर शांततापूर्ण वातावरण होते. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळीच मतदान करून नागरिकांसमोर आदर्श ठेवत सर्व नागपूरकरांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले.








