Published On : Sat, Sep 7th, 2019

‘अटल शस्त्र मार्केनॉमी’तर्फे नागपूर महानगरपालिकेला ‘बेस्ट सस्टेनेबल ॲण्ड लिव्हेबल’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

‘मार्केनॉमी इन्फ्रा लिडरशीप’ पुरस्काराने आयुक्त अभिजीत बांगर सन्मानित

नागपूर : शास्वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमाची दखल घेत मनपाला पाचव्या ‘अटल शस्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार २०१९ या सोहळ्यामध्ये गौरविण्यात आले आहे. ‘अटल शस्त्र मार्केनॉमी’तर्फे नागपूर महानगरपालिकेला ‘मार्केनॉमी‘ बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्लिन ॲण्ड इक्ल्यूझिव इन्फ्रा सिटी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

मुंबई येथील इंडियन मर्चंट चेम्बर येथे नुकतेच झालेल्या पुरस्कार समारंभामध्ये मनपाचा गौरव करण्यात आला. याच पुरस्कार समारंभामध्ये मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनाही सन्मानित करण्यात आले. आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘मार्केनॉमी इन्फ्रा लिडरशीप अर्बन म्युनिसिपल इन्फ्रा ॲण्ड स्मार्ट सिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दोन्ही पुरस्कारांचा स्वीकार केला.

पुरस्काराबद्दल महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. शहराच्या शास्वत विकासासाठी तसेच स्वच्छ, सुंदर व हिरवे नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व स्मार्ट सिटी इन्फ्रास्टक्चर उभारणीसाठीही प्रशासनातर्फे विविध कार्य करण्यात आली आहेत, त्यांच्या कार्याला या पुरस्कारामुळे सन्मान मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात शहरात चौफेर विकास सुरू आहे. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात आणि दुरदृष्टीमधून मनपा आर्थिक बळकटीसाठी विविध प्रकल्पही विकसीत करण्यात आले आहेत. या सर्व संकल्पना, उपक्रमांची योग्य अंमलबजावणी करुन नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या महत्वपूर्ण कार्याचा हा सन्मान आहे, अशा शब्दांमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाच्या कार्याची प्रसंशा केली.

‘अटल शस्त्र मार्केनॉमी’च्या ज्यूरी पॅनलतर्फे पुरस्कारासाठी मनपाची निवड करण्यात आली. मार्केनॉमीचे मुख्य संपादक व संस्थापक प्रकाशक प्रा.ए.जी. अय्यर यांच्या अध्यक्षतेतील ज्यूरी पॅनलमध्ये जॉईंट चेअरमन इमेरिटसचे मार्गदर्शक व अध्यक्ष सुरेश शर्मा, सदस्य तोशिबा इंडियाचे सल्लागार व ॲक्यूनर्जीचे एमडी टी.सी. अरोरा, सेटू फाउंडेशनचे संस्थापक व मार्केनॉमी फाउंडेशनच संस्थापक सदस्य हेतल मेहता, वेथ इंडियाचे माजी उपाध्यक्ष पीव्‍हीएसएन मुर्ती, एस.के. कन्स्लटिंगचे सीईओ आणि मार्केनॉमी फाउंडेशनच संस्थापक सदस्य प्रख्यात शर्मा यांच्यासह आंतरराष्ट्रीय ज्यूरी सल्लागार सदस्य पीएचपीए भूटान चे व्यवस्थापकीय संचालक आर.एन.खझांची, ई.यू. एफएसएआय चे संचालक डॉ. हृदेश खन्ना, ज्यूरी सदस्य मार्केट मार्केनॉमीचे सीईओ व संचालक गणेश अय्यर, ज्यूरी कन्वेनर मार्केनॉमीचे संस्थापक संपादक आर. थैगराजन अय्यर, ज्यूरी समन्वयक मार्केनॉमी फाउंडेशनच्या संचालक स्टेफी अय्यर यांचा समावेश आहे.