Published On : Tue, Jun 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात शाळेच्या पहिल्याच दिवशी मनपा आयुक्तांचा दौरा;जलभराव-अतिक्रमणावर अधिकाऱ्यांना सुनावले

Advertisement

नागपूर : महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली असली, तरी संजय नगर येथील संजय गांधी हिंदी प्राथमिक शाळेतील परिस्थितीने प्रशासनाची पोलखोल केली. शाळेच्या पहिल्याच दिवशी मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी शाळेला भेट दिली असता परिसरात साचलेले पावसाचे पाणी आणि मैदानावरील अतिक्रमण त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच फैलावर घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

पाहणीदरम्यान शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या खेळासाठी असलेल्या मैदानावर अतिक्रमण झाल्याने त्याचा वापर करणेही अशक्य झाल्याचे दिसून आले.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या परिस्थितीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागांना जलनिस्सारणाची व्यवस्था तात्काळ सुधारण्याचे आणि शाळेचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि पालकांनी शाळेतील जलभराव व अतिक्रमणाचा प्रश्न नवीन नसून अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचा आरोप केला. शाळा सुरू होण्यापूर्वीच या समस्या सोडविणे आवश्यक होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांनाच त्याचा फटका बसत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

आयुक्तांच्या पाहणीनंतर संबंधित विभाग आता किती वेगाने कारवाई करतो आणि विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित व अडथळामुक्त शालेय वातावरण उपलब्ध करून देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.