Advertisement

मुंबई : नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान झालेल्या या घटनेत एसी थ्री-टियर कोचच्या खिडकीची काच फुटून दगड थेट डब्यात घुसला.
दगडफेकीत एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, दगडफेक नेमकी कुठे झाली आणि त्यामागचे कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेचा तपास सुरू आहे.



