Advertisement
नागपूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी नागपुरात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा पारा थोडा कमी झाला होता. मात्र आज पुन्हा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. कालपासूनच शहरातील नागरिक उन्हामुळे त्रस्त आहेत. मागील चोवीस तासांत र्वाधिक तापमानवाढ नागपुरात नोंदविण्यात आली. शनिवारी ३१.२ अंशांवर राहिलेला पारा रविवारी ८.५ अंशांनी वाढून ४० अंशावर गेला. अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, वर्धा येथेही ४१ अंशांवर तापमानाची नोंद करण्यात आली.
नागपूर आणि विदर्भातील उन्हाळा हा सहसा तीव्रच असतो. मात्र यंदाचा उन्हाळा हा अधिक तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे.