Published On : Fri, Jul 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

उमरेड रोडवर एमडी पावडर विकणारा तस्कर जेरबंद; ७ ग्रॅमहून अधिक एमडी जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट-४ची कारवाई; १.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड रोडवर सापळा रचून एमडी पावडर विक्रीसाठी थांबलेल्या एका तस्कराला अटक केली. आरोपीकडून ७ ग्रॅमहून अधिक एमडी पावडर, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट-४ पथक हुडकेश्वर परिसरात गस्त घालत असताना उमरेड रोडवरील त्रिमूर्ती बारजवळ एक युवक एमडी पावडर विक्रीसाठी ग्राहकांची वाट पाहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चौकशीत आरोपीची ओळख शेख ताज शेख रहमान कुरेशी अशी झाली. तो व्यवसायाने कसाई असल्याचे समोर आले. एनडीपीएस कायद्यानुसार झडती घेतली असता त्याच्याकडून प्लास्टिकच्या पुडीत ठेवलेले ७ ग्रॅमहून अधिक एमडी पावडर जप्त करण्यात आले. याशिवाय रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.

प्राथमिक चौकशीत आरोपीने इस्माईल नावाच्या व्यक्तीकडून एमडी पावडर खरेदी करून त्याची विक्री करत असल्याची कबुली दिली. सुरुवातीला तो स्वतः अमली पदार्थांच्या व्यसनाधीन झाला होता, त्यानंतर तस्करीच्या व्यवसायात उतरल्याचेही तपासात उघड झाले आहे.

Advertisement

अटक केलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार एमडी पुरवठादार इस्माईलचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.