Published On : Fri, Jul 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर गुन्हे शाखेचा मोठा पराक्रम; चार वर्षांपासून फरार मुख्य महिला आरोपीला अटक

गुन्हे शाखेच्या युनिट-३ची लावा परिसरात धडक कारवाई
Advertisement

नागपूर : खून प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य महिला आरोपीला नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-३ने अखेर अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लावा परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख अश्विनी सूरज देशभ्रतार (वय ३२) अशी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये कळमना पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, पोक्सो कायदा आणि इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची तक्रारही याच महिलेने दिली होती.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र, मृताच्या वडिलांसह अश्विनी देशभ्रतार हिला दोषी ठरविण्यात आले. मृताच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर अश्विनी ही निकालापूर्वीच फरार झाली होती. ती राज्याबाहेर वास्तव्यास असल्याची माहिती तपासात समोर आली होती.

गुन्हे शाखेच्या युनिट-३ला आरोपी महिला लावा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून तिला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.