Published On : Wed, Jul 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एमडीच्या नशेच्या आहारी लावून विवाहितेवर सामूहिक बलात्कार; दोघांविरुद्ध गुन्हा

अश्लील चित्रफितींच्या आधारे ब्लॅकमेल
Advertisement

नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेला एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या व्यसनाच्या आहारी लावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा तसेच अश्लील छायाचित्रे व चित्रफिती तयार करून दीर्घकाळ ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग कटारिया (२५) आणि आशीष शास्त्री (२५) या दोघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथके विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तक्रारीनुसार, विवाहानंतर पीडित महिलेने संगणक प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिची अनुरागशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर आरोपीने तिला एमडीचे सेवन करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर ती अमली पदार्थाच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचा आरोप तिने केला आहे.

यानंतर अनुरागने तिची ओळख त्याचा मित्र आशीषशी करून दिली. दोघांनी तिला त्यांच्या खोलीवर नेऊन अमली पदार्थ देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या वेळी तिची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफितीही तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

पीडितेच्या म्हणण्यानुसार, या चित्रफिती आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपींनी दीर्घकाळ तिचे लैंगिक शोषण केले. तसेच तिच्या घरी घुसूनही अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पीडितेने अखेर संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. पतीच्या मदतीने तिने खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून त्यांचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.