Published On : Mon, Jul 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एमडी ड्रग्सविरोधात पोलिसांचा मोठा प्रहार; 28 ग्रॅम मेफेड्रोनसह दोन तस्करांना अटक

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात यशोधरा नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत 28 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ससह दोन तस्करांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थांसह एक मोबाईल फोनही जप्त केला असून, दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशोधरा नगर पोलिसांचे पथक मंगळवारी मध्यरात्री ईटा भट्टी चौक परिसरात गस्त घालत असताना एका संशयित तरुणाची हालचाल पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांना पाहताच त्याने खिशातील वस्तू लपवण्याचा आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

झडतीदरम्यान आरोपी इरफान अमजद खान याच्या ताब्यातून सुमारे 28 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. चौकशीत ही एमडी त्याने रेहान नईम सय्यद याच्या मदतीने खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी रेहानलाही अटक केली.

दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ नेमके कुठून आणण्यात आले होते आणि त्याचा पुरवठा कोणाला केला जाणार होता, याचा तपास यशोधरा नगर पोलीस करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.