
नागपूर,: नागपूर शहराची अतिशय जुनी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असणारा ‘मारबत महोत्सवाला यावर्षी प्रथमच बॉलीबुडमधील कलावंत व विविध देशातील वाणिज्य राजदूतांनी हजेरी लावल्याने जागतिक स्तरावर ओळख प्राप्त झाली आहे. तऱ्हाने तेली समाजतर्फे आयोजित पिवळी मारबत व काली मारबत उत्सव समितीच्या वतीने आयोजित काळी मारबत आणि विविध बडग्या आयोजन समितीतर्फे आयोजित बडग्या या नागपूरच्या लोक परंपरेतील या महोत्सवाचा ढोल-ताशांच्या गजरात आनंद व आस्वाद या पाहुण्यांनी घेतला.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे अर्थ व नियोजन राज्यमंत्री श्री. आशीष जयस्वाल, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार डॉ. राजीव पोतदार, महापौर श्रीमती निता ठाकरे, फ्रांसचे वाणिज्यदूत पॅट्रीक लेवेरीनो, नॉर्वेच्या वाणिज्य दूत मोनिका निगलगार्ड, फिनलँडच्या वाणिज्यदूत पेट्रा थीमन, प्रसिद्ध अभिनेता श्री. जॅकी श्रॉफ, सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. सुभाष घई, प्रसिद्ध क्रिकेटपटू श्री. उमेश यादव, अभिनेता श्री. अंकुश चौधरी, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील आयुक्त डॉ. विपीन, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती आभा पांडे, क्रीडा समितीच्या सभापती सौ. दर्शना धवड, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, माजी महापौर श्रीमती अर्चना डेहनकर यांच्यासह साम टीव्हीचे संपादक श्री. निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक श्रीमती सरिता कौशिक, प्रसिद्ध शेफ श्री. विष्णू मनोहर, ग्राफीक डिझायनर श्री. विवेक रानडे यांनी या महोत्सवाला हजेरी लावली.
मुख्यमंत्री, महापौर यांच्यासह फ्रांस, नॉर्वे, व फिनलँड देशाचे वाणिज्य राजदूतांनी पिवळी मारबतच्या मिरवणुकीवर पुष्प वर्षांव केला. यावेळी चितार ओळी चौकात जमलेल्या हजारो संख्येच्या नागरिकांनी जल्लोष करून इडा पिडा घेऊन जा गे… मारबत… या घोषणेचा गजर केला.
पाहुण्यांकडून स्वागत
नागपूरची ही परंपरा विशेष असून मारबत महोत्सवाला 145 वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे. नागपूर शहराची ही परंपरा व संस्कृतीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी नागपूर मनपाने पुढाकार घेऊन यावर्षी प्रथम मारबत महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. ही एक एकमेवाद्वितीय संकल्पना साकारल्याबद्दल तसेच दीडशे वर्षांपासून सातत्याने नागपूरकरांनी या परंपरेचे जतन केल्याबद्दल पाहुण्यांनी विशेष आभार मानले. ही लोक परंपरा कायम राखण्यासाठी तसेच महोत्सवाला जागतिक स्वरुप देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या संकल्पनेचे सर्वांनी कौतुक केले.
या महोत्सवाला धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, माजी आमदार श्री. सुधाकर कोहळे, महाराष्ट् टाईम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्री. अतुल पांडे,गांधीबाग झोनच्या सभापती श्रीमती उमा देशमुख, सतरंजीपुरा झोन सभापती श्रीमती अभिरुची राजगिरे, दुर्बल घटक समिती सभापती कु. लक्ष्मी हत्तीठेले, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती श्रीमती सारिका नांदूरकर, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, विधी समिती सभापती कु. निधी तेलगोटे, नगरसेविका कु. दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेवक श्री. हेमंत बरडे, श्री. संजय बालपांडे, श्री. सुधीर बंडू राऊत, श्री. सुबोध आचार्य, श्री. सुरज गोजे, नगरसेवक श्री. तुषार लारोकर, नगरसेविका श्रीमती स्विटी भिसीकर, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर, नगरसेविका श्री.माया हाडे, , श्रीमती विद्या कान्हेरे, नगरसेवक श्री. सचिन नाईक, नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, नगरसेवक श्री. योगेश पाचपोर, नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे, श्री. संजय चवरे, श्री दीपक पटेल, श्रीमती रेखा निमजे, श्रीमती चेतना निमजे, श्रीमती नगरसेवक श्री. कल्पक भानारकर, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक, श्रीमती कल्पना शर्मा, श्रीमती प्रमिला गौर यांच्यासह इतर नगरसेवक, उपायुक्त श्री. मंगेश खवले, सहायक आयुक्त श्री. अनिकेत धोपट, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, श्री. राजीव गौतम, श्री. सचिन रक्षमवार, श्री. अनिल गेडाम, श्री. राजेंद्र राठोड, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुकर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी मोठ्या संख्येने प्रथमच आयोजित केलेल्या मारबत महोत्सवाला हजेरी लावली.
नागपूरच्या पंरपरेला जागतिक ओळख देण्याचा उपक्रम – मुख्यमंत्री
या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरच्या या परंपरेला जागतिक स्वरुप देण्याचा हा प्रयत्न निश्चितपणे स्तुत्य आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा सभापती सौ. दर्शना धवड यांच्या मार्गदर्शनात मारबत महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मनपाचे अभिनंदन केले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मरबत उत्सवाला १४५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असल्याचे सांगितले. मारबतीच्या जुन्या परंपरेला सांस्कृतिक पर्यटनाचे स्वरूप देऊन जागतिक स्तरावर लोकांना ही परंपरा समजावी, अनुभवता यावी या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने चांगली प्रसिद्धी केली आहे. त्यांनी मारबतीच्या उत्सवाला जागतिक महोत्सव करण्याचा महानगरपालिकेने जो प्रयत्न केला त्यासाठी महानगरपालिकेचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या जीवनात असणाऱ्या सर्व पिडा, प्रामुख्याने दुष्काळाच्या पिडेला घेऊन जावे अशी इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री यांनी बडग्या व मारबतच्या आयोजकांचा उत्साह वाढविला.
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारी या काळी मारबत, पिवळी मारबत व बडग्या या नागपूरच्या लोक संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. समाजातील घातक व दुष्ट प्रवृत्तींना आळा बसून सज्जन शक्तींना बळ मिळावे, या उद्देशाने ही लोक परंपरा दरवर्षी मोठ्या थाट्यात साजरी केली जाते. काळी व पिवळी संगम झाल्यानंतर दोन्ही मारबतीचे लोक एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देतात.
विदेशी पाहुण्यांनी घेतला आस्वाद
मारबत महोत्सवासाठी फ्रांस, नॉर्वे व फिनलँडच्या वाणिज्य दूतांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती. या तिन्ही वाणिज्य दूतांनी नेहरू पुतळा येथून निघणाऱ्या काळी मारबतीच्या मिरवणुकीचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी या मिरवणुकीचा पुरेपूर आस्वाद घेतला. अनेकांनी छायाचित्रे काढ़ून तसेच मोबाईलमध्ये क्षण चित्रबद्ध केले. याच ठिकाणी काळी मारबत व जागनाथ बुधवारी येथून निघाणारी पिवळी मारबतीचे मिलन होते. तेथून या दोन्ही मारबतीच्या मिरवणुकी शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करीत तलावात विसर्जन केली जाते. या मिरवणुकीसोबत मस्कासाथ येथून निघणाऱ्या बडग्याचे सुद्धा या मिरवणुकीत निघते. शहरातील विविध भागातून वेगवेगळ्या संकल्पना घेऊन मारबत काढली जाते.
फेल्ड मार्शलचा बडग्या
यावर्षी बडग्याची संकल्पना पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यावर आधारित होती. भारतासोबत नेहमीच युद्धाची भाषा करणाऱ्या फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या फेल्ड (अयशस्वी) मार्शल असे वर्णन करून बडग्या काढण्यात आला होता.
जॅकी श्रॉफने “बीडू…!” म्हणताच उपस्थितांमध्ये संचारला उत्साह
सुप्रसिद्धसिने अभिनेते श्री. जॅकी श्रॉफ यांनी आपल्या चितपरिचित अंदाजात “बीडू” उच्चारताच उपस्थितांमध्ये एकच उत्साह संचारला, त्यांनी “इडा पिडा घेऊन जा गे….! चा घोष देत उपस्थितांनी प्रतिसाद देत “मारबत” असा घोष दिला. परिणामी संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले. याशिवाय त्यांनी नृत्य करीत उपस्थितांच्या विनंतीला मान दिला. प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी इडा पिडा घेऊन जा गे मारबत अशा घोषणा देऊन मिरवणुकीतील नागरिकांची मने जिंकली. यावेळी अनेकांनी जॅकी श्रॉफ सोबत सेल्फी काढून घेतली.
प्रारंभी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मुख्यमेत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मारबत महोत्वसाचा मोमेंटो, मानाचा दुपट्टा देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे यावेळी पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, सर्व वाणिज्य राजदूत,अभिनेता जॅकी श्रॉफ, सुभाष घई, क्रिकेटपटू उमेश यादव यांचे ही स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी चर्चा करताना सर्व पाहुण्यांनी आयोजनाबद्दल मनपा व इतर आयोजकांची प्रशंसा केली. स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. मनपाने आयोजित केलेल्या पहिल्या मारबत महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पाहुण्यांचे विमानतळावर आदरपूर्वक स्वागत
नागपूरच्या पारंपरिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या मारबत महोत्सवाच्या अनुषंगाने फ्रान्सचे वाणिज्य राजदूत मा. पॅट्रीक लेवेरनो, नॉर्वेच्या वाणिज्य राजदूत मा. मोनीका नागलेगार्ड, फिनलेंडच्या वाणिज्य राजदूत मा. पेत्रा थेमान यांच्यासह सुप्रसिद्ध सिने अभिनेता श्री. जॅकी श्रॉफ, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्री. सुभाष घई, भारतीय क्रिकेटपटू श्री. उमेश यादव, सिने अभिनेता श्री. अंकुश चौधरी, वरिष्ठ संपादक श्री. निलेश खरे, वरिष्ठ संपादक श्रीमती सरिता कौशिक या सर्व मान्यवरांचे शुक्रवार (ता. ११) रोजी शहरात आगमन झाले. यावेळी अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभपती श्रीमती शिवानी दाणी वखरे, विधी विशेष समिती सभापती कु. निधी तेलगोटे, दुर्बल घटक समिती कु. लक्ष्मी हत्तीठेले, नगरसेविका कु. दुर्गेश्वरी कोसेकर, मनपाचे सर्वश्री राजीव गौतम, राजेश दुपारे, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय क्रीडापटू श्री. उमेश यादव हे मारबतीच्या उत्सवात असलेल्या नागरिकांच्या प्रचंड उत्साहाला पाहून भावनिक झाले. त्यांच्यासाठी हा अत्यंत रोमहर्षक क्षण असल्याचे आणि अशा विलक्षण गोष्टी फक्त नागपूर शहरातच होऊ शकतात असे सांगितले. नागपूरचा हा पारंपरिक व संस्कृतिक उत्सव जगभरापर्यंत पोहचावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. नागपूर हे आता छोटे राहीले नसून, मोठे व प्रगत झाले आहे. जेव्हा अशा वेगवेगळ्या गोष्टींचे आयोजन नागपूर शहरात होतात तेव्हा एक नागपूरकर म्हणून गर्व वाटत असल्याचे सांगितले.
श्री.सुभाष घई यांनी सांगितले की खूप कमी लोकांना माहिती आहे की नागपूर ही त्यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे नागपूर सोबत त्यांचे खास नाते आहे. नागपूरात होणारा मारबत उत्सव गेल्या १४५ वर्षांपासून होत असल्याचे त्यांनी सांगितले.





