Advertisement
नागपुर: राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा झपाट्याने होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
नागपुरात कोरोनाचं वाढतं संकट पाहता शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी ही माहिती दिली आहे.
नागपुरात गेले 5 दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. नागपूर शहरात रोज 500 पेक्षा जास्त कोरोना बाधित आढळत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर महापालिका खडबडून जागी झाली आहे. शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
Advertisement