नागपूर :काँग्रेसने राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.या यादीत नागपूर मतदारसंघातून काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली. ठाकरे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणुकीचा रिंगणात उतरणार आहेत. यापूर्वी काँग्रेसने राज्यातील 7 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज 23 मार्चला काँग्रसने राज्यातील 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
विदर्भातील चार उमेदवारांना काँग्रेसने दिली संधी-काँग्रेसने राज्यातील दुसऱ्या यादीत विदर्भातील चार उमेदवार जाहीर केले आहेत. रामटेकमधून रश्मी बर्वे यांना तर गडचिरोलीतून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील जाहीर करण्यात आलेले उमेदवार –
कोल्हापूर – शाहू महाराज, सोलापूर – प्रणिती शिंदे, पुणे -रवींद्र धंगेकर, नागपूर-विकास ठाकरे, भंडारा गोंदिया -प्रशांत पडोळे, रामटेक – रश्मी बर्वे, गडचिरोली -नामदेव किरसान, नंदुरबार -गोवल के पाडवी, अमरावती -बलवंत वानखेडे, नांदेड – वसंतराव चव्हाण, लातूर – शिवाजीराव काळगे हे उमेदवार राज्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.