Advertisement
नागपूर:होळी हा सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपारिक सण आहे. लोक या सणाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी केले जाते. या अनुषंगाने नागपुरात आज २३ मार्चला ठिकठिकाणी विधीपूर्वक होलिका दहन करण्यात आले.होलिका दहनाच्या पूजेमध्ये काही विशेष गोष्टींचा समावेश केल्यास फलदायी होते आणि पूजा यशस्वी होते. होलिका दहनाच्या दिवशी सुक्या लाकडाच्या ढिगाबरोबर शेणाची पोळी किंवा पोळी जाळण्याची परंपरा आहे.
होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून नाकेबंदीही करण्यात आली आहे. त्यासाठी विविध ३९ फिक्स पॉईन्ट लावण्यात येणार आहे. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्येच होळी साजरी करावी लागणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.