Published On : Fri, Jul 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मध्यस्थी करणे जीवावर बेतले; समजावण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूचे सपासप वार

खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी आरोपी अटकेत
Advertisement

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या २१ वर्षीय हेमंत सोनवणे याच्यावर आरोपीने पोट, पाठ आणि हातावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढराबोडी परिसरात उशिरा रात्री ऋतिक उर्फ भुर्या महेब हा दारूच्या नशेत वाद घालत होता. त्यावेळी हेमंत सोनवणे याने मध्यस्थी करत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी संतापला. त्याने प्रथम शिवीगाळ केली आणि त्यानंतर घरातून चाकू आणून पुन्हा घटनास्थळी आला.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर आरोपीने हेमंतच्या पोटावर चाकूने जोरदार वार केला. बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या हाताच्या बोटालाही दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्याच्या पाठीवरही वार केले. या हल्ल्यात हेमंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी ऋतिक उर्फ भुर्या महेब याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.