Published On : Fri, Jul 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पती-पत्नी घरातूनच चालवत होते गांजाचा अवैध व्यवसाय; ७ किलोहून अधिक गांजा जप्त

१.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत
Advertisement

नागपूर : शहरातील यशोधरानगर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत घरातून गांजाची विक्री करणाऱ्या पती-पत्नीला अटक केली आहे. संघर्ष नगर परिसरातील त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ७ किलो ६९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत १ लाख ७६ हजार रुपये असून दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी संघर्ष नगर येथील घरावर छापा टाकला. घराची झडती घेत असताना एका प्लास्टिकच्या पोत्यामध्ये लपवून ठेवलेला ७.०६९ किलो गांजा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणात मोहम्मद सरफराज अख्तर अन्सारी आणि त्याची पत्नी गोसिया परवीन सरफराज अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात दोघेही आर्थिक फायद्यासाठी आपल्या घरातूनच गांजाची अवैध विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

दोन्ही आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा गांजा कुठून आणला जात होता, तसेच त्याची विक्री आणि पुरवठा कोणाला केला जात होता, याचा तपास यशोधरानगर पोलीस करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.