Published On : Tue, Jul 21st, 2015

नागपूर : काटोल तालुका क्रीडा प्रशिक्षकांच्या सभाचे आयोजन

Advertisement


2015-16 स्पर्धा कार्यक्रम जाहीर  

katol
काटोल (नागपूर)।
स्थानिक बनराशिदास हायस्कूल व कनिष्ट महा. विद्यालयात जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा समितीच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा आयोजना संबंधी सभेचे आयोजन मंगलवार 21 जुलैला करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी दीपक समुदरे, तालुका क्रीडा समिती सचिव अनिल धांडे, वालीबाल प्रशिक्षक राउत सर आदि उपस्थित होते.

जिल्हा व अन्य स्तरावरील स्पर्धाचे शालेय स्तरावर आयोजन करण्यात येते. तालुक्यातील 42 माध्यमिक शाळा, याशिवाय इंग्रजी माध्यमाचे शाळामधील खेळाडू व्यक्तीक व सांघिक खेळान सहभागी होतात. सत्र 2015-16 मध्ये एकूण 79 खेळांचा समावेश करण्यात आल्याची माहिती क्रीडा अधिकारी दीपक समुदरे यांनी दिली. ग्रामीण भागातील खेळाडूंना संघी मिळावी याकरिता नव्याने फुटबाल, बुद्धिबळ, क्रिकेट, बेडमिंटन, कराटे असे पांच खेळांचा समावेश करण्यात आला. असल्याचे त्यांनी सांगितले या पूर्वी वोलीबाल, खो-खो, कबड्डी, कुस्ती व मैदानी स्पर्धा असे पांच खेळ पूर्वरत ठेवण्यात आले. असून एकूण दहा खेळामध्ये ग्रामीण खेळाडूंना खेळता येणार आहे.

सुब्रतो मुखर्जी कप फुटबाल स्पर्धा 28 जुलै पासून पोलिस मुख्यालय विशप कॉटन स्कूल व सेंट सेंट उर्सुला येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धाची कार्यक्रम पत्रिका www.nagpursports.com वेबसाईटवर असल्याचे सभेत सांगितले. तालुका स्तरावरील स्पर्धा कार्यक्रम याप्रमाणे कबड्डी स्पर्धा 24 ऑगस्ट, वालीबाल 25 ऑगस्ट, खो-खो दि. 26 ऑगस्ट, मैदानी स्पर्धा 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आल्याची माहिती क्रीडा समन्वयक तथा तालुका क्रीडा सचिव अनिल धांडे यांनी दिली. सभेला तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा प्रतिनिधी उपस्थित होते.