Published On : Tue, Jun 2nd, 2015

नागपूर : मनपा व योगाभ्यासी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २१ जून जागतिक योग दिवस साजरा करणार

Advertisement


पूर्वतयारीसाठी मा. महपौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

NMC Meeting Yoga din 02 Jaune 2015
नागपूर। २१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहरातही हा दिवस साजरा करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतलेला आहे.

नागपुरातील जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सहकार्याने महानगरपालिकेच्या यशवंत स्टेडीयम येथे २१ जून २०१५ रोजी हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. यात २१ हजार लोक एकाच वेळी योगासने करतील. या कार्यक्रमाचे पूर्वतयारीसाठी महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. २ जून, २०१५ रोजी दुपारी डॉ. स्मृती स्थायी समिती सभाकक्षात सभा झाली. या सभेला उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे, सत्तापक्षनेता, सत्तापक्षनेता दयाशंकर तिवारी, कर आकारणी संकलन समितीचे सभापती गिरीश देशमुख आदी उपस्थित थे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरातील विविध भागांमध्ये योग जागृतीच्या दृष्टीने शिबिरांचे आयोजन करण्यात यावे असेही निर्देश मा. महापौरांनी दिले. प्रशासनाने या कार्यक्रमासाठी आवश्यक ती तयारी सुरु करावी, अशा सूचना मा. महापौरांनी यावेळी दिल्यात.

Advertisement
Advertisement