Published On : Tue, Jun 2nd, 2015

नागपूर : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट


लांजाळा गावात चोवीस शेततळी

Collector's visit of aqueous suburbs Mission work (1)
नागपूर। जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज कुही तालुक्यातील लांजाळा, मोहाडी व कुचाडी या गावात  लोकसहभागातून जलयुक्त अभियानाअंतर्गेत चालू असलेल्या कामांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, पुर्नेवसन अधिकारी प्रकाश पाटीलए उमरेडच्या उपविभागीय अधिकारी डॉ.  दीप्ती सुर्यवंशी, तालूका कृषी अधिकारी वासनिक उपस्थित होते.

लांजाळा या गावात चोवीस शेततळयांची कामे घेण्यात आली आहे. त्यापैंकी वीस कामे पूर्ण झाली असून या गावातील पाण्याची पातळी वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. सोयाबीन, तूर, कापूस या पीकांचा पेरा वाढणार असल्याचे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुर्वे यांना सांगितलेण.

Advertisement

या शेततळयांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल याशिवाय मत्स्य शेती करण्यास मोठा वाव असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सुधाकर ठाकरे यांच्या शेततळयास भेट देऊन पाहणी केली. मोहाडी व कुचाडी या गावाच्या सिमारेषेवर असलेल्या नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. याकामासही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मोहाडी चे उपसरपंच विनोद गणपत तुरक यांचेसोबत चर्चा करुन गावात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांविषयाची माहिती घेतली. यावर्षीच्या मान्सून पीक कर्ज घेणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला अडचण भासणार नाही. त्यासाठी तालूका सुविधा केंद्र तहसिल कार्यालयात करण्यात येईल. या केंद्रात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
Collector's visit of aqueous suburbs Mission work (4) Collector's visit of aqueous suburbs Mission work (3) Collector's visit of aqueous suburbs Mission work (2) Collector's visit of aqueous suburbs Mission work (5)

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement