Published On : Mon, Aug 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

पत्रकारांच्या आरोग्याचीही काळजी; नागपुरात भव्य आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

२०० हून अधिक पत्रकार व कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी
Advertisement

नागपूर : समाजाच्या समस्या, वेदना आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात २०० हून अधिक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेत मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोमलवाडा येथील गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आयोजित या शिबिराला सकाळपासूनच मोठा प्रतिसाद मिळाला. धावपळीच्या पत्रकारितेमुळे नियमित आरोग्य तपासणीसाठी वेळ न मिळणाऱ्या अनेक पत्रकारांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिबिराचे उद्घाटन माजी आमदार संदीप जोशी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि नागपूर विभागाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिरोग, मेंदूरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, मूत्ररोग, दंतरोग, मानसिक आरोग्य, क्षयरोग, श्वसनविकार, कर्करोग आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी, ईसीजी, २-डी इको, मॅमोग्राफी, बीएमडी आणि पीएफटीसारख्या अत्याधुनिक चाचण्याही मोफत करण्यात आल्या.

Advertisement

एम्स आणि गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करून आवश्यक उपचार व पुढील वैद्यकीय मार्गदर्शन केले.

समाजासाठी सतत धावणाऱ्या पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देण्याची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला. अशा आरोग्य शिबिरांचे दरवर्षी आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.