Published On : Thu, Jul 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात राशन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला!

अपहरण करून पुन्हा मारहाण
Advertisement

नागपूर : शहरातील हुडकेश्वर परिसरात कथित शासकीय रेशन धान्याच्या अवैध साठ्याचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर अज्ञातांनी भरदिवसा जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी पत्रकाराचे अपहरण करून दुसऱ्या ठिकाणी नेले आणि तेथेही पुन्हा मारहाण केली. या घटनेत पत्रकार संदीप भीमराव सुरडकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडीला आठ आणि डोक्यावर चार टाके घालावे लागले आहेत.

माहितीनुसार, संदीप सुरडकर हे ‘एक विश्व’ साप्ताहिकाचे संपादक असून ते यूट्यूब न्यूज चॅनलही चालवतात. सामाजिक कार्यकर्ते व ‘मिशन बहुजन’चे संस्थापक राकेश दशरथ घारगावे यांनी प्रभातनगर परिसरातील एचपी गॅस गोदामाजवळील एका घरात मोठ्या प्रमाणात शासकीय रेशन धान्याचा अवैध साठा असल्याची माहिती दिली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी दोघे घटनास्थळी गेले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तेथे पोहोचल्यावर त्यांना तीन टाटा बोलेरो वाहनांमध्ये भरलेले रेशन धान्य आणि घरात मोठ्या प्रमाणावर साठा आढळल्याचे सांगण्यात आले. संशय बळावल्याने सुरडकर यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. याचदरम्यान तीन ते चार अज्ञात आरोपी घटनास्थळी आले आणि कोणतीही चर्चा न करता लोखंडी रॉडने त्यांच्यावर बेछूट हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राकेश घारगावे यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला.

हल्लेखोरांनी गंभीर जखमी अवस्थेतील संदीप सुरडकर यांना जबरदस्तीने काळ्या रंगाच्या टाटा हॅरिअर कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना खरबी चौक परिसरात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. दरम्यान, पोलिसांचे वाहन येत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्यांना रस्त्यावर सोडून घटनास्थळावरून पलायन केले.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी जखमी पत्रकाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर घटनास्थळ हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी प्रकरण हुडकेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

फिर्याद आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे शोध पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे रेशन धान्याच्या कथित काळाबाजाराचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या घटनेची पुष्टी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे यांनी केली असून, गुन्ह्याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पत्रकारावर झालेल्या या हल्ल्यामुळे नागपूरातील पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी विविध पत्रकार व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.