Published On : Tue, Aug 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या नागपूर रोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१०,४५७ नोंदणी, ३,२५७ युवकांची उपस्थिती, ५७३ उमेदवारांची निवड
Advertisement

नागपूर: युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. अभिजीत वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी आशीर्वाद बँक्वेट, Variety Square, Sitabuldi, नागपूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मेळाव्यासाठी तब्बल १०,४५७ उमेदवारांनी नोंदणी केली, तर ३,२५७ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवली. विविध नामांकित कंपन्यांच्या मुलाखती आणि निवड प्रक्रियेनंतर एकूण ५७३ उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये ५५८ उमेदवारांची निवड विविध सहभागी कंपन्यांसाठी, तर TCS मध्ये १५ उमेदवारांची निवड झाली.

या रोजगार मेळाव्यात 78 हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. IT, Manufacturing, Banking, Finance, Retail, Automobile, BPO, Service आणि इतर विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नागपूरसह पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये रोजगाराच्या विविध संधी युवकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

हाईस्ट पैकेज 12 लाख रु प्रति वर्ष चा देण्यात आला .यामध्ये Cyberathon , TCS , Digital Zoo , Mahindra logistics , Tata strive , SBI Life , Axis , Coder Technologies , Just dial यासमवेत ७८ कंपनीज चा सहभाग होता .

Advertisement

या कार्यक्रमाला नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे, नागपूर शहर कांग्रेस चे अध्यक्ष प्रफुल गूढ़धे, नागपुर महानगरपालिका चे विरोधिपक्ष नेते संजय महाकाळकर,कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, , कांग्रेस नेते गिरीश पांडव ,नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी , डाॅ. शकील सत्तार, नगरसेवक सुहास मानवटकर , यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, सहभागी कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.

आमदार अभिजीत वंजारी यांनी रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवक-युवतींचे आभार मानले. युवकांच्या रोजगारासाठी आणि कौशल्यविकासासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.