Published On : Fri, Sep 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

जरीपटका हादरलं; जिंजर मॉलजवळ युवकाची चाकूने हत्या; जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष

Advertisement

शराब के लिए पैसे नहीं देने पर बीयर की बोतल से हमला, आरोपी गिरफ्तार

नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिंजर मॉलजवळील मटन मार्केट परिसरात जुन्या वादातून एका १६ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. आबिद उर्फ आबू रज्जाक शेख असे मृत युवकाचे नाव आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे ९ ते १० वाजताच्या सुमारास मटन मार्केट परिसरात काही युवकांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन हाणामारीत रूपांतरित झाला. याचदरम्यान आरोपींनी लुंबिनी नगर येथील रहिवासी आबिदवर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत आबिद रक्ताच्या थारोळ्यात पडला.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आबिदला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

प्राथमिक तपासात जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाचपावली परिसरातील काही युवकांसोबत आबिदचा वाद झाला होता. याच वादाचा समझोता करण्याच्या बहाण्याने त्याला जिंजर मॉलजवळ बोलावण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

Advertisement

या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.