Published On : Thu, Jul 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील थरारक हत्याकांडाचा निकाल; कैद्याच्या खुनाप्रकरणी आरोपीला जन्मठेप

बहुचर्चित कुश कटारिया हत्याकांडातील आरोपीची तुरुंगात निर्घृण हत्या; न्यायालयाचा कठोर निर्णय
Advertisement

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात घडलेल्या अत्यंत गाजलेल्या कैदी हत्याकांडप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुरज कोकणाके याला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 अंतर्गत दोषी ठरवत आजीवन कारावास (जन्मठेप) आणि एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. हा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर तोतला (DJ-21) यांनी दिला.

न्यायालयात सिद्ध झालेल्या पुराव्यानुसार, सुरज कोकणाके हा यापूर्वीच खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक 5 मध्ये ठेवण्यात आला होता. त्याच काळात त्याने त्याच बॅरेकमधील कैदी आयुष निर्मल पुगलिया याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अभियोजनाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने बॅरेक क्रमांक 5 जवळील स्वच्छतागृहात आयुष पुगलिया याच्या डोक्यावर फरशीचा तुकडा मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर कारागृहातील स्वयंपाकगृहातील मोठ्या चमच्याच्या दांडीला धार लावून तयार केलेल्या धारदार वस्तूने त्याच्या गळ्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण कारागृह प्रशासनात खळबळ उडाली होती.

या खटल्यात सरकार पक्षाने न्यायालयासमोर एकूण 21 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे, जप्ती पंचनामे, वैद्यकीय पुरावे आणि धंतोली येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा (Forensic Science Laboratory) अहवाल हे आरोपीविरुद्ध महत्त्वाचे आणि निर्णायक पुरावे ठरले. न्यायालयाने या सर्व पुराव्यांचा सखोल विचार करून आरोपीचा गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध झाल्याचे नमूद केले.

Advertisement

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्याम खुळे यांनी प्रभावी युक्तिवाद करत खटल्याचे कामकाज पाहिले.

विशेष म्हणजे, हत्या झालेला कैदी आयुष निर्मल पुगलिया हा पूर्वीच्या बहुचर्चित कुश कटारिया हत्याकांडातील आरोपी असल्याने या कारागृहातील हत्येने त्यावेळी मोठी चर्चा निर्माण केली होती. तुरुंगाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे कारागृहाच्या चार भिंतीआड घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांनाही कायद्याचा कठोर बडगा लागू होतो, असा स्पष्ट संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

रविकांत कांबळे

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.