Published On : Wed, Aug 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात इंस्टाग्रामवरुन मैत्री १६ वर्षीय मुलीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : सोशल मीडियावरील बनावट ओळख वापरून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढत तिच्यावर तब्बल दीड वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. आरोपीने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून मुलीशी मैत्री केली, तिचा विश्वास संपादन केला आणि खासगी छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत वारंवार लैंगिक शोषण केले. हुडकेश्वर पोलिसांनी दिगडोह येथील भाड्याच्या खोलीवर छापा टाकून मुलीची सुटका केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

झोन-४च्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात यश आले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी या प्रकरणात ठाणे येथील निर्भय माधव पाखरे (वय २०) याला अटक केली आहे. तो बीबीएचा विद्यार्थी असून पीडित मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे.

सहेलीला भेटण्याचे सांगून घराबाहेर, रात्री अपहरणाचा गुन्हा-
रविवारी सकाळी मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने आणि मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. पहाटे हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

Advertisement

तांत्रिक तपासातून आरोपीचा माग काढला-
मोबाईल सर्व्हेलन्स आणि सोशल मीडियावरील हालचालींचा तपास करताना आरोपीचे लोकेशन दिगडोह येथील एका भाड्याच्या खोलीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा न उघडल्याने अनर्थाची शक्यता लक्षात घेऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मुलीची सुटका केली.

खोलीतील परिस्थिती पाहून पोलिसही हादरले-
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. ती सुमारे १८ तासांपासून खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. खोलीत चाकू आणि चामड्याचा पट्टा आढळून आला. त्यानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

बनावट इंस्टाग्राम खात्याद्वारे मैत्री, नंतर ब्लॅकमेल-
आरोपीने ‘आकाश मेहरा’ या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून मुलीशी संपर्क साधला होता. विश्वास संपादन केल्यानंतर तिची खासगी छायाचित्रे मिळवून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात उघड झाले.

इतर पीडिताही आहेत का? तपास सुरू-
आरोपी नागपुरात आल्यानंतर हॉटेल किंवा भाड्याच्या खोलीत मुलीला बोलावत असे. विरोध केल्यास छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत होता. आरोपीच्या मोबाईल, सोशल मीडिया खात्यांसह डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून, अशाच प्रकारे इतर मुलींनाही त्याने जाळ्यात ओढले आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा-
आरोपीविरुद्ध पोक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांचे आवाहन-
डीसीपी रश्मिता राव यांनी पालक आणि तरुणांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही परिस्थितीत खासगी फोटो, व्हिडिओ किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये. ब्लॅकमेल किंवा धमकी मिळाल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.