Published On : Wed, Aug 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात १.१४५ किलो गांजासह युवक जेरबंद; मुख्य आरोपी फरार, शोधमोहीम सुरू

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ किलो १४५ ग्रॅम गांजासह एका युवकाला अटक केली आहे. आरोपीकडून गांजा आणि मोबाईल फोनसह एकूण ४३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्टच्या रात्री चितार ओळीतील नागोबा गल्ली क्रमांक-२ येथे उत्तमचंद मोदी यांच्या घरासमोर ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून शेख जुबेर शेख आबिद (२५, रा. चितार ओळी, महाल) याला अटक केली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

४३ हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त-
आरोपीकडून १ किलो १४५ ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत २८,६५० रुपये) आणि १५ हजार रुपयांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४३,६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे-
तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध शांतिनगर पोलीस ठाण्यात २०२४ मधील दोन गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

मुख्य आरोपी फरार; एनडीपीएसचे सहा गुन्हे-
या प्रकरणातील शेख इम्तियाज शेख जब्बार (६५, रा. चितार ओळी, महाल) याला फरार आरोपी घोषित करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत एनडीपीएस कायद्यान्वये सहा गुन्हे, तसेच तहसील पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही नोंद आहे.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा-
अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस हवालदार पवन गजभिये यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(अ), २०(ब)(२)(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.