Published On : Fri, Jul 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपातसह नशेच्या औषधांचा काळाबाजार; दोन औषध विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा

Advertisement

नागपूर -डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे तसेच अंमली पदार्थांच्या गैरवापरासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची कथित बेकायदा विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी दोन औषध विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या औषधांचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि ती कोणापर्यंत पोहोचली, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई नागपुरातील गंजीपेठ येथील संदेश औषध बाजारातील ‘द बॉम्बे फार्मा’ या मेडिकल स्टोअरवर करण्यात आली. १० जून रोजी अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात गर्भपातासाठी वापरले जाणारे ‘कॉन्ट्राकिट’ तसेच चिंता आणि पॅनिक डिसऑर्डरच्या उपचारासाठी वापरले जाणारे ‘अल्प्राझो ०.५’ हे औषध मोठ्या प्रमाणात आढळून आले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या दोन्ही औषधांची विक्री केवळ नोंदणीकृत डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनवरच करता येते. मात्र तपासादरम्यान औषधांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील बिले आणि आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली असता संबंधित विक्रेते कोणतीही वैध नोंद सादर करू शकले नाहीत.

अन्न व औषध प्रशासनाने औषधांचा साठा जप्त करून संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी विमल चांदवाणी आणि विक्की चांदवाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

सध्या पोलिस या औषधांचा पुरवठा नेमका कुठून झाला, तसेच ही औषधे कोणकोणाला विकली गेली, याचा तपास करत असून संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.