Published On : Thu, Aug 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

हिंगणाच्या चक्री घाट जंगलात अज्ञात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; हत्या की अपघात? तपास सुरू

Advertisement

नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव येथील चक्री घाट जंगलात एका अज्ञात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह सुमारे ६ ते ८ दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज असून तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. हिंगणा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे वय २५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृताच्या अंगावर अर्ध्या बाह्यांचा काळ्या व तपकिरी रंगाचा टी-शर्ट असून त्यावर “SCOTT” असे लिहिलेले आहे. तसेच फिकट खाकी रंगाची पँट असून त्यावर “Tiago” असा उल्लेख आहे. मृताच्या हाताच्या एका बोटात अंगठीही आढळली आहे. मात्र घटनास्थळी कोणतेही ओळखपत्र किंवा अन्य कागदपत्र मिळाले नाही.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मृताची ओळख पटविण्यासाठी डीएनए नमुने सुरक्षित ठेवण्यात आले असून नागपूरसह परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी सुरू आहे.

दरम्यान, हा मृत्यू अपघाती आहे की हत्या करून मृतदेह जंगलात फेकण्यात आला आहे, याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे. हिंगणा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित कपड्यांच्या आधारे किंवा बेपत्ता व्यक्तीची माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.