Published On : Wed, Aug 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मुलं आई-वडिलांची मालमत्ता नाहीत; जीवनसाथी निवडण्याचा अधिकार, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Advertisement

नागपूर : सज्ञान मुलांना आपल्या आयुष्याबाबत स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मुलं ही आई-वडिलांची मालमत्ता नसून, त्यांना आपल्या पसंतीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले.

नागपूरमधील एका १७ वर्षीय मुलीच्या प्रकरणातून हा मुद्दा समोर आला. मुलगी ट्यूशनला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती एका युवकासोबत जाताना दिसून आली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला आईच्या ताब्यात दिले. मात्र काही काळानंतर तिने पुन्हा घर सोडले.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर मुलीच्या आईने तिचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. न्यायालयाने मुलीचा जबाब नोंदवला असता, तिने स्वतःच्या इच्छेने युवकासोबत गेल्याचे सांगितले. तसेच पुढेही त्याच्यासोबत राहण्याची इच्छा असल्याचे तिने स्पष्ट केले.

सुनावणीच्या वेळी मुलगी सज्ञान झाली होती. त्यामुळे तिला स्वतःच्या इच्छेनुसार जीवनसाथी निवडण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मुलगी अल्पवयीन असताना संबंधित युवकाने तिला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले होते, हा आईचा दावा न्यायालयाने मान्य केला नाही.

Advertisement

हेबियस कॉर्पस याचिकेसाठी संबंधित व्यक्तीचा बेकायदेशीर ताबा सिद्ध करणे आवश्यक असते. या प्रकरणात असा बेकायदेशीर ताबा सिद्ध न झाल्याने नागपूर खंडपीठाने आईची याचिका फेटाळून लावली.

मुलांच्या ताब्याच्या प्रकरणात पालकांच्या अधिकारांपेक्षा मुलांचे हित अधिक महत्त्वाचे असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे सज्ञान व्यक्तीला आपल्या जीवनाबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा आणि पसंतीचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.