Published On : Tue, Aug 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील हसनबागमध्ये मिनी कॅसिनोचा पर्दाफाश; सहा जुगारी अटकेत

Advertisement

नागपूर : हसनबाग चौकाजवळ लॉटरी आणि गेम पार्लरच्या आडून सुरू असलेल्या कथित मिनी कॅसिनोचा नंदनवन पोलिसांनी पर्दाफाश केला. ९ ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी छापा टाकून कॅसिनो मशीनवर पैशांचा जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रकमेसह दोन संगणक, सात कॅसिनो मशीन आणि अन्य साहित्य असा एकूण २ लाख २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, नंदनवन पोलिसांचे पथक ९ ऑगस्टच्या रात्री परिसरात गस्त घालत असताना हसनबाग कब्रस्तानाजवळील एका लॉटरी व गेम पार्लरमध्ये कॅसिनो मशीनच्या माध्यमातून जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास पार्लरवर छापा टाकला.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कारवाईदरम्यान सहा जण कॅसिनो मशीनवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सैयद मोहम्मद मुसव्विरुद्दीन सलामुद्दीन सैयद काजी (२३), अब्दुल सलमान अब्दुल सलाम (३४), अब्दुल अजीम अब्दुल रहीम (३४), मोहम्मद अक्रम मोहम्मद बैतुल्ला (४५), काशीनाथ दादाजी येवले (४७) आणि मदन काशीनाथ बडगे (५६) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी घटनास्थळावरून ३ हजार २६० रुपये रोख, दोन संगणक, सात कॅसिनो मशीन आणि अन्य जुगाराचे साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख २६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

पार्लर मालकाच्या भूमिकेचीही चौकशी
प्राथमिक चौकशीत आरोपींनी दुकान मालक अभिषेक याच्या मदतीने कॅसिनोच्या माध्यमातून जुगार सुरू असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पार्लरचे संचालन कोण करत होते, हा जुगार किती दिवसांपासून सुरू होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या मशीन आणि संगणकांचीही तपासणी केली जात आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे लॉटरी आणि गेम पार्लरच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगाराच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.