Published On : Fri, Oct 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत दुपारी १२ वाजेपर्यंत २३.९३ टक्के मतदान

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक २७.२३ टक्के मतदान; भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी प्रतिसाद
Advertisement

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत दुपारी १२ वाजेपर्यंत २३.९३ टक्के मतदान

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी मतदान सुरू असून, सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत विभागात एकूण २३.९३ टक्के मतदान झाले आहे. सहा जिल्ह्यांतील एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांपैकी ६१ हजार १७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक २७.२३ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ वर्धा जिल्ह्यात २६.०९ टक्के, गडचिरोलीत २६.४८ टक्के, नागपूर जिल्ह्यात २३.७४ टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यात २३.०७ टक्के मतदानाची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी १९.२७ टक्के मतदान झाले.

विभागातील एकूण मतदानाच्या आकडेवारीनुसार, पुरुष मतदारांपैकी २७.०९ टक्के, तर महिला मतदारांपैकी १९.६५ टक्के मतदारांनी मतदान केले. इतर प्रवर्गातील मतदारांचे मतदान शून्य टक्के नोंदविण्यात आले आहे.

दुपारी १२ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून, मतदानाची प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे आगामी तासांत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.