Published On : Fri, May 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये क्रीडा जल्लोष; 8व्या खासदार क्रीडा महोत्सवाची 31 मे पासून होणार सुरुवात

Advertisement

नागपूर : नागपूर शहर पुन्हा एकदा क्रीडा उत्साहाने भारावून जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आणि स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ देणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सव या उपक्रमाचे आठवे पर्व 31 मे ते 7 जून 2026 दरम्यान नागपूर शहरात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

या संदर्भात भाजपा नेते आणि संयोजक आमदार संदीप जोशी यांनी हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

केवळ नागपूर शहरासाठी विशेष आयोजन-
यावर्षी वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, आयोजनात विशेष बदल करण्यात आला आहे. स्पर्धेचा विस्तार मोठा असला तरी हा महोत्सव यंदा फक्त नागपूर शहरातील खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आला आहे. शहरातील सुमारे 20 मैदानांवर ही स्पर्धा पार पडणार असून सर्व मैदानी सामने रात्रीच्या वेळेत आयोजित केले जाणार आहेत.

18 क्रीडा प्रकारांचा भव्य समावेश-
या आठव्या पर्वात एकूण 18 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यात कुस्ती, मॅराथॉन, खो-खो, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, कबड्डी, जलतरण, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, योगासन, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, टेबल टेनिस आणि सॉफ्टबॉल यांसारख्या खेळांचा समावेश आहे.

Advertisement

57 लाखांहून अधिक बक्षीस रक्कम-
या महोत्सवासाठी एकूण ₹57 लाख 63 हजार इतकी भव्य रोख पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे. तसेच विजेत्यांना ट्रॉफी आणि पदके देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.

शहरातील क्रीडा संस्कृतीला नवा उभारी-
नागपूर शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील गुणवत्ता समोर आणणे आणि क्रीडा संस्कृती मजबूत करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. विविध सहसंयोजकांच्या सहभागातून हे आयोजन अधिक प्रभावी आणि भव्य होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये पुन्हा एकदा क्रीडा महाकुंभाचा उत्साह पाहायला मिळणार असून शहरातील युवा खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.