Published On : Wed, Jun 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरने भरभरून प्रेम दिले, शहराच्या आठवणी कायम सोबत राहतील; डॉ. रविंद्र सिंगल यांचे भावनिक विधान

Advertisement

नागपूर : नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण करून पदाचा निरोप घेताना माजी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी नागपूरकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. नागपूरमध्ये सेवा बजावताना मिळालेल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

‘नागपूर टुडे’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. सिंगल यांनी आपल्या कार्यकाळातील विविध उपक्रम, आव्हाने आणि यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. “नागपूर हे केवळ नियुक्तीचे ठिकाण नव्हते, तर या शहराशी एक भावनिक नाते निर्माण झाले. येथील नागरिकांनी दिलेले प्रेम आणि पाठिंबा कधीही विसरता येणार नाही,” असे ते म्हणाले.

आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ऑपरेशन थंडर, मिशन मुक्ती, अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमा आणि ऑपरेशन यू-टर्न यांसारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमांमुळे गुन्हेगारी नियंत्रणासह सामाजिक जनजागृतीलाही चालना मिळाली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी जनसंपर्क वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले.

अज्ञात मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या सिंबा ॲपचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या हरवलेल्या नातेवाइकांचा शोध लागण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नागपूर पोलिस दलाने सलग दोन वेळा विजेतेपद मिळविल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

“हे यश केवळ माझे नसून नागपूर पोलिस दलातील आठ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचे फलित आहे,” असे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले.

कार्यकाळात अनेक गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करताना सुरुवातीला कोणतेही ठोस पुरावे नसतानाही पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य शासनाने नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नागरे पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्यांना शुभेच्छा देताना डॉ. सिंगल यांनी नागपूर पोलिस दल भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करेल, असा विश्वास व्यक्त केला.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges