Published On : Tue, Sep 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेबंदीचे नियम धाब्यावर;तिघांवर गुन्हे

; ७५ मिरवणुकांतील वाद्यांचे नमुने पोलिसांकडून संकलित
Advertisement

नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेबंदीचे नियम धाब्यावर;तिघांवर गुन्हे

नागपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे, बीम लाइट आणि लेझर बीमच्या वापरावर बंदी असतानाही काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. शहरातील दोन वेगवेगळ्या भागांत डीजे सुरू असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीतील ७५ ठिकाणांहून वाद्यांचे नमुने घेण्यात आले असून, त्याच्या तपासणीनंतर आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर परिसरात शनिवारी रात्री डीजेचा आवाज सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्री सुमारे ११ वाजता पोलिसांनी कारवाई करत मंगेश राऊत आणि निखिल वडगावकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मानकापूर परिसरातही डीजेबंदीचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. झिंगाबाई टाकळी येथील गीतानगर परिसरात शनिवारी सायंकाळी डीजे वाजविल्याचे निदर्शनास आल्यानंतर मानकापूर पोलिसांनी मुकेश इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

यंदाच्या उत्सव काळात ध्वनीप्रदूषणावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गणेशोत्सवासह विविध धार्मिक आणि सामाजिक मिरवणुकांमध्ये मोठ्या क्षमतेच्या साउंड सिस्टिमचा वापर केला जातो. मात्र, मोठ्या आवाजामुळे ध्वनीप्रदूषण वाढण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

Advertisement

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत डीजे, बीम लाइट आणि लेझर बीमच्या वापरावर निर्बंध लागू केले आहेत. हे आदेश ३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून १ नोव्हेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

चार बेस आणि चार टॉपच्या साउंड सिस्टिमला परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात प्रात्यक्षिक घेण्यात आले. मात्र, ध्वनीची पातळी ७५ डेसिबलपेक्षा अधिक आढळल्याने या मागणीला पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली नाही.

गणेश विसर्जनाच्या काळात पोलिसांनी ७५ मिरवणुकांमधील वाद्यांचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीनंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.