Published On : Thu, Jul 23rd, 2015

नागपूर (सावनेर) : भालेराव विज्ञान महाविद्यालयावर धड़क मोर्चा

Advertisement

Morcha Saoner

सावनेर (नागपूर)। वाढीव प्रवेशाचा प्रक्रियेसाठी विद्यालय प्राचार्य व कमिटी यांचावर सावनेर विधानसभा युवक कोंग्रेस व अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचा सयुक्त विद्यमाने 23 जुलाईला सकाळी 11 वाजता भालेराव महाविद्यालयाचा गेटसमोर असंख्य विद्यार्थी, पाकल, व कर्यकर्त्याचा उपस्थितीत निदर्शन करुण आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना बीएससी विद्यान शाखेत प्रवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नसल्याने त्यांचे शेक्षणिक वर्ष वाया जात असल्यामुळे वारंवार संचाकल मंडळ भालेराव हायस्कूल सावनेर व प्राचार्य यांचाशी संवाद साधून तसेच महाराष्ट्र शासनाचा परिपत्रानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावे अशा अनेक वेळी चर्चा होउन सुद्धा आज पर्यंत प्रलंबित प्रवेश घेउ इच्छीनाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते की काय अशी वेळ असता सावनेर विधासभा युवक कोंग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे, व अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद तालुका अध्यक्ष अरुण रुषीया यांचा नेतृत्वाखालील शेकडो कार्यकर्त्यासोबत विद्यालयाचा प्रवेश द्वारावर ठिया आंदोलन पुकारण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतुक वेवस्था विस्कळीत होउ पाहता सा.पोस्टेचे पोनि शैलेश सपकाळ यांनी आपल्या ताफ्यासाह आंदोलन स्थळ गाठून आंदोलन कर्त्याची मते जानुन घेतली व मध्यस्थिची भूमिका बजावत संचालक मंडळ व प्रचार्याशी संवाद साधुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. प्राचार्य विद्यापिठात मीटिंग मध्ये असल्याने प्राचार्या तर्फे प्रवेश कमिटीचे प्रमुख प्रा.डॉ.विलास डोइफ़ोडे प्रा.डॉ. सुनील डोंगरे ,प्रा.मिलिंद बरबटे, प्रा.प्रशांत डबरासे यांचाशी सपकाळ यांनी चर्चा केली व विद्यार्थ्यांचे वाढीव मागणीकरिता दिलेले पत्र व उपाययोजने संबंधी माहिती घेऊन ती विध्यार्त्याना सांगितली.

नागपूर विद्यापीठानी मान्यता दिल्यास विध्यार्थ्याना प्रवेश देण्यात येइल असे मत प्रवेश कमिटी प्रमुख प्रा.डॉ डोइफ़ोडे, प्रा.डॉ सुनील डोंगरे, प्रा.मिलिंद बरबटे, प्रा.डबरासे यांनी दिली. तर पोनि सपकाळ यांनी आंदोलन करत्यांना तिन चार दिवसात विद्यालय संचालक मंडळ, प्राचार्य, युवक कोंग्रेस, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद, व पालक वर्गाची सयुक्त सभा बोलाउन वाढीव प्रवेशाला येनाऱ्या अड़ीअड़चनिवार तोड़गा काढून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाता कामा नाही या करिता ठोस उपाय योजना आखन्यात येइल असे सांगताच आंदोलनाची सांगता करण्यात आली.

या आंदोलनाला राजेश खंगारे, अरुण रुषिया, किशोर ढूंढेले, प्रवीन झाडे, राहुल वाघमारे, आशु नकाशे, अभय पगारे, विजय कुहिटे, दादू कोलते, सोहेल माळाधारी, राहुल घोंगडे, नितिन व इतर प्रामुख्याने उपस्थित होते.