Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात 11 जुलैला ‘रहे ना रहे हम…’ या अजरामर गीतांची मैफल

Advertisement

नागपूर : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांनी अजरामर केलेल्या सदाबहार गीतांचा सुरेल ठेवा रसिकांसमोर उलगडणारा ‘रहे ना रहे हम…’ हा विशेष संगीत कार्यक्रम ११ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

अरुणाई आणि सप्तक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, आयटी पार्क, गायत्री नगर, नागपूर येथे रंगणार आहे.

या मैफलीत सुरभी ढोमणे, रसिका बावडेकर, मुकुल पांडे आणि डॉ. निशिकांत लोखंडे हे गायक लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या गाजलेल्या गीतांना आपल्या आवाजातून उजाळा देणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सचिन ढोमणे आणि सहकारी यांचे असून सूत्रसंचालन व निवेदन डॉ. मनोज सालपेकर करणार आहेत.

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील सदाबहार सुरांची मेजवानी अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून संगीतप्रेमींना मिळणार आहे. मात्र, हा कार्यक्रम ‘सप्तक’च्या सभासदांसाठीच आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.