Published On : Thu, Oct 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ई-रिक्षाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

Advertisement

Nagpur E-Rickshaw Battery Theft Gang Busted, 2 Arrested

नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी ई-रिक्षाच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून चोरीचा छडा लावला आहे. आरोपींकडून चोरीच्या चार ई-रिक्षा बॅटऱ्या तसेच गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

संजय गांधीनगर येथील रहिवासी रविराज वानखेडे यांनी ई-रिक्षाच्या बॅटऱ्या घराबाहेर चार्जिंगसाठी लावल्या होत्या. ३ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी या बॅटऱ्या चोरून नेल्या. याप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्याआधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. पेट्रोलिंगदरम्यान दोघे संशयित पोलिसांच्या हाती लागले. चौकशीत त्यांची नावे अब्दुल इब्राहिम आणि इब्राहिम खान अशी समोर आली.

आरोपींच्या निशाणदेहीवरून पोलिसांनी चोरीच्या चार ई-रिक्षा बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन जप्त केले. या आरोपींनी आणखी किती चोरीच्या घटना केल्या आहेत, तसेच चोरीचा माल कुठे विकला याचा तपास यशोधरानगर पोलीस करत आहेत.

Advertisement

याबाबत यशोधरानगर पोलीस ठाण्याचे युनूस शेख यांनी माहिती दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.