नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमत चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. उशिरा रात्री झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकमत चौक येथील कोटक महिंद्रा बँकेसमोर राजेश इंगळे, राम बैरिकर आणि स्वप्नील वानखेडे हे तिघे आपापली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून मद्यप्राशन करत होते. मद्याच्या नशेत त्यांनी रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
या प्रकाराची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधितांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी शांत होण्याऐवजी पोलिसांसमोरच आरडाओरडा व शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.
यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांनाही ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे, गोंधळ घालणे आणि शिवीगाळ करणे या आरोपांखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सीताबर्डी पोलीस करीत असून सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





