Published On : Tue, Aug 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर कनेक्शन असलेल्या आंतरराज्यीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; ५४ कोटींचे एमडी जप्त

Advertisement

हैदराबाद : तेलंगणा पोलिसांनी यदाद्री-भुवनगिरी जिल्ह्यात आंतरराज्यीय अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान तब्बल २७ किलो मेफेड्रोन अर्थात एमडी आणि ४० किलो अॅसिटोन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत सुमारे ५४ कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोंडामडुगु परिसरातील एका गुप्त प्रयोगशाळेत एमडी तयार केली जात होती. या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी रसायन प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र, सेंट्रीफ्यूजसह अन्य साहित्य जप्त केले.

या प्रकरणात नागपूर येथील ४९ वर्षीय चेतन मधुकर मेश्राम याला कथित सूत्रधार आणि आर्थिक मदत करणारा आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आकाश अशोक गावंडे याच्यासह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर नागपूरचा गोपाल सिरपत पटले आणि चंदा प्रदीप ठाकूर हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

तपासात तयार करण्यात आलेली एमडीची खेप नागपूर आणि विदर्भातील विविध भागांत पुरवठा करण्याची तयारी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रॅकेटचे नागपूर कनेक्शन आता पोलिसांच्या रडारवर आले असून, संपूर्ण अमली पदार्थ पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे. रॅकेटशी संबंधित आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.