Published On : Fri, Jul 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बेकायदेशीर सुरू असलेल्या डाउन टाउन हुक्का पार्लरवर छापा; कर्मचाऱ्यासह नऊ जणांवर गुन्हा

Advertisement

नागपूर : शहरातील अवैध हुक्का पार्लरविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत सदर पोलिसांनी बूटी कंपाउंड, माउंट रोड परिसरातील एका हुक्का पार्लरवर उशिरा रात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत परवानगीशिवाय हुक्का सेवा सुरू असल्याचे आणि ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करून हुक्का दिला जात असल्याचे उघड झाले.

विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी डाउन टाउन हुक्का पार्लर येथे अचानक छापा टाकला. धाड पडताच पार्लरमध्ये गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासात संबंधित पार्लरकडे आवश्यक शासकीय परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूयुक्त हुक्का पुरविला जात असल्याचेही समोर आले. याप्रकरणी पार्लरचा संचालक गौरव बोकडे, कर्मचारी परेश मदन सोरते आणि हुक्का सेवन करणाऱ्या सात ग्राहकांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी हुक्का संच, विविध प्रकारचे फ्लेवर्ड तंबाखू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर साहित्य असा सुमारे १.५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधातील मोहीम यापुढेही अधिक कठोरपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.