Published On : Wed, Jun 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात प्रेमसंबंधातून वाद, युवकाची हत्या; यशोधरा नगर परिसरात खळबळ!

Advertisement

नागपूर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका खून प्रकरणाची भर पडली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष नगर परिसरात प्रेमसंबंधातून सुरू झालेला वाद रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाला. या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवकाची ओळख सलमान अशफाक अन्सारी (रा. संघर्ष नगर) अशी झाली आहे. सलमानचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात असून, याच कारणावरून त्याचा स्थानिक युवक मुजम्मिल याच्याशी काही काळापासून वाद सुरू होता.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंगळवारी मध्यरात्री संघर्ष नगर येथील टिपू सुलतान चौकात दोघांची समोरासमोर भेट झाली. सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चौकातील एका पानटपरीजवळ दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. या हल्ल्यात सलमान गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेत सलमानला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच संघर्ष नगर व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी मुजम्मिल याच्याविरोधात यापूर्वीही काही गुन्ह्यांची नोंद असल्याची चर्चा आहे. घटनेनंतर तो फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता-
नागपूर शहरात सातत्याने समोर येणाऱ्या खून, हाणामारी आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. किरकोळ वाद थेट जीवघेण्या हल्ल्यांपर्यंत पोहोचत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

पोलिसांकडून तपास सुरू-
या प्रकरणाचा तपास यशोधरा नगर पोलिसांकडून सुरू असून प्रेमसंबंध, जुनी वैमनस्यता तसेच इतर संभाव्य कारणांच्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे. खुनामागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.