नागपूर : नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी मतदारांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आमिष दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, या आरोपांना काँग्रेसचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी ठामपणे फेटाळून लावले आहे.
अतुल लोंढे यांनी दावा केला की, काही मतदारांना अज्ञात क्रमांकांवरून फोन करून “आता ५ लाख रुपये घ्या आणि उर्वरित ५ लाख रुपये नंतर दिले जातील” असे प्रलोभन दिले जात आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
मात्र, संजय महाकाळकर यांनी लोंढे यांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “काहीही पुरावा नसताना अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. जर आरोपांमध्ये तथ्य असेल तर त्याचे ठोस पुरावे समोर आणावेत. केवळ आरोप करून निवडणुकीचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होऊ नये,” असे म्हटले.
महाकाळकर यांनी पुढे “काही आधार असेल तरच अतुल लोंढे यांनी असे आरोप करावेत,” असे सांगत आरोप पूर्णपणे फेटाळून लावले.
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणावर आता निवडणूक यंत्रणा किंवा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





