धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे –धनजंय मुंडे

Advertisement

नागपूर: क्या हुआ तेरा वादा असं धनगर समाज सरकारला विचारत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे आणि आम्हाला ९७ च्या चर्चेत तसे अपेक्षित आहे अशी स्पष्ट भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम ९७ च्या चर्चेदरम्यान मांडली.

आज सकाळी धनगर समाजाच्या आरक्षणावर अल्पकालीन चर्चा झाली त्यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या धोरणावर शरसंधान साधले.

टीस ही स्वायत्त संस्था आहे.या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार किंवा दर्जा नसताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राहय मानला जाईल अशी शंका धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

सरकारचे मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही असे सांगितले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परवा धनगर समाजाच्या आरक्षणाच्याविरोधात बोलले.यांचे सर्वोच्च नेते विरोधात बोलत असतील तर राज्याचे मंत्री कसे आरक्षण देणार असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.