आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला दया –आमदार रामराव वडकुते

Advertisement

mla Ramrao Wadakute

नागपूर: आमचं… आमच्या हक्काचं आणि घटनेनं दिलेलं आरक्षण आम्हाला दया हीच आमची मागणी आहे अन्यथा आमचे युवक रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही अशी भावना निर्माण झाली असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रामराव वडकुते यांनी सरकारला दिला.

नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेत धनगर आरक्षणाचा मुद्दा आमदार रामराव वडकुते यांनी आज सभागृहात मांडला.

मात्र चर्चा करण्यापूर्वी रामराव वडकुते यांनी या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री येणार होते ते येणार आहेत की नाही हे कळावे तरच मी बोलतो असे स्पष्ट केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर समाजाच्या भावना इथे मांडल्या जाणार असून आमदार रामराव वडकुते यांची चर्चा घ्यावी तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना बोलवावे असे सांगितल्यावर आमदार रामराव वडकुते यांनी चर्चा सुरु केली.

चर्चा सुरु असताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी येणार आहेत असे सांगितले.त्यामुळे चर्चा सुरु झाली

धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगून ४ वर्षे झाली परंतु कोणतीच पाऊले उचलली गेली नाहीत. फक्त धनगर समाजाला फसवण्याचे काम केले गेले आहे. घटनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी तरतुद केली आहे. धनगड आणि धनगर हे एकच आहेत त्यामुळे आमचा आदिवासीमध्ये समावेश आहे तो हक्क आम्हाला दया तरच तुमचं राज्य टिकेल असा निर्वाणीचा इशाराही दिला.