Published On : Thu, Sep 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील घटना

जनावरे चारण्यासाठी गेलेल्या बापुराव ढोबळे यांच्यावर हल्ला; वनविभागाकडून घटनास्थळी शोधमोहीम आणि गस्त वाढवली
Advertisement

Auto Draft

रामटेक, नागपूर: देवलापार वनपरिक्षेत्रातील सीतापार बिटात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी सुमारे ५ ते ६ वाजताच्या दरम्यान पिंडकापार उपवनक्षेत्रातील चोपण गड्डा परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत व्यक्तीचे नाव बापुराव कृष्णा ढोबळे (७०), रा. लोधा असे आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जनावरे चारण्यासाठी गेले असताना हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी देवलापार वनपरिक्षेत्रातील सीतापार बिटाच्या कक्ष क्रमांक ४६५ आरएफ मधील चोपण गड्डा परिसरात गेले होते. याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Advertisement

घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.

घटनास्थळी मृतदेह आढळला

वनविभागाच्या पथकाला शोध घेत असताना बापुराव ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केला.

मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. वाघाच्या हल्ल्यातच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, पुढील तपास आणि आवश्यक प्रक्रिया वनविभागाकडून सुरू आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेनंतर सीतापार आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

जंगल परिसरात नागरिकांनी एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

वाघाच्या हल्ल्याच्या या घटनेमुळे वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून पुढील उपाययोजना केल्या जात आहेत.

अजय मेहरकुळे | रामटेक, नागपूर

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.