Published On : Tue, Apr 10th, 2018

क्रेझी कॅसल होणार बंद, नागपूरकरांच्या नशिबी ‘रखरखित उन्हाळा’

Advertisement

Crazy castle
नागपूर: मेट्रो प्रकल्पासाठी अंबाझरी स्थित नासुप्रचे ‘क्रेझी कॅसल’ची हस्तांतरण प्रक्रिया सुरु झाली आहे. चार दिवसांपूर्वी नागपूरच्या खासदारांच्या घरी मेट्रो, एनएमसी, एनआयटी आणि हल्दीराम व्यवस्थापनामध्ये झालेल्या बैठकीनंतर लगेच पार्कची संरक्षक भिंत आणि पार्किंग लॉट तोडण्याचे काम सुरु झाले.

हल्दीराम व्यवस्थापनाचा करार २०२५ पर्यंत होता, परंतु मेट्रोच्या कामासाठी ते आपली लीज सोडायला तयार झाले. यासाठी खासदारांमार्फत स्थापन केलेली समिती त्यांना योग्य ती नुकसानभरपाई देऊ करणार आहे. हल्दीरामला २००० ते २००१ दरम्यान या पार्कची कंत्राट मिळाले. तर २००६ साली क्रेझी कॅसल लोकांसाठी खुले झाले. महामेट्रोचे महासंचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे की, मेट्रोसाठी क्रेझी कॅसल पार्कची केवळ १०-१५ % जागेची आवश्यकता भासणार आहे. ज्यात पार्किंग लॉटचा देखील समावेश आहे.

ते काहीही असो परंतु क्रेझी कॅसलमधील सध्याचे वातावरण मात्र काही औरच आहे. नागपूर टुडेने तेथे भेट दिली असता तेथे फार उत्साही चित्र दिसले. सगळीकडे लोकांची लगबग आहे. लाकडी प्रवेशद्वारांना नवा रंग दिला जातोय. तेथे सुरक्षारक्षक आणि स्वागतसाठी कर्मचारी वर्ग तैनात आहे. उद्यानाच्या आतमध्ये तरुणाईचा थरार आणि उत्साह पाहायला मिळतोय. ते १०० फूट फ्री फॉल आणि ४५ बंजी इजेक्शन आणि क्रेझय स्विंगर्स झुल्यांची मजा लुटताना दिसतात. तर चोरी मुले मात्र कॅटर पिलर, कॅरोसुल आणि कार्टून ट्रेनवर खेळत असतात. रविवारचा दिवस असल्याने जवळ्जवळ १५०० लोक पार्कच्या अंतर्भागात होते.

Crazy castle
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक नागपूरकर त्यांच्या आप्त मित्रांसमवेत क्रेझी कॅसलला भेट भेट देतात अशी माहिती पार्कचे व्यवस्थापक गौतम रॉय यांनी दिली. या काळात पार्कला भेट देण्यारयांची संख्या दिवसाला ३००० पर्यंत जाते. कारण शहरातील इतर वॉटरपार्क हे लगतच्या भागात जवळपास ४० ते ६० किमी दूर अंतरावर आहेत.

लोकांना मेट्रोचे महत्व माहित आहे. त्यासाठी ते खस्ता देखील खात आहेत. परंतु यासाठी नागपूरचे एकमेव अम्युसमेंट पार्क बंद करणे खरंच आवश्यक आहे काय ?, लोक उन्हाळ्यामध्ये वेळ घालवण्यासाठी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुठे जातील ? करणं आधीच शहरात मौजमजेचा आणि फावला वेळ घालवण्याच्या ठिकाणांची कमतरता आहे.

त्याचप्रमाणे इथे काम करणारे ५५० कर्मचारी बेरोजगार झाल्यावर त्यांना मिहान, पतंजली फूड पार्क किंवा बुटीबोरी एमआयडीसी मध्ये रोजगार मिळण्याची खात्री आहे का ?. मागील दोन वर्षांपासून आम्हाला मेट्रोसाठी क्रेझी कॅसलवर टांगती तलवार असल्याची भीती आता प्रत्यक्ष होत आहे. हे अतिशय अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे.

अखेर नागपूरकरांचे आवडते मनोरंजन स्थळ नेहमीसाठी हिरावले जाणार काय ?

Crazy castle