Published On : Thu, Oct 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ई-रिक्शामधून महिलेच्या पर्समधून सोन्याची चेन लंपास; क्राईम ब्रँचने महिला आरोपीला केली अटक

Advertisement

नागपुरात ई-रिक्शामधून महिलेच्या पर्समधून सोन्याची चेन लंपास; क्राईम ब्रँचने महिला आरोपीला केली अटक

नागपूर : ई-रिक्शामधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून सोन्याची चेन चोरल्याप्रकरणी क्राईम ब्रँचच्या अँटी चेन स्नॅचिंग पथकाने एका महिला आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे एक लाख रुपये किमतीची चोरीची सोन्याची चेन जप्त केली आहे.

ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. १ सप्टेंबर रोजी ५४ वर्षीय मीना हातमोडे या तुकडोजी पुतळा येथून मेडिकल चौकाच्या दिशेने ई-रिक्शातून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका अज्ञात महिलेने नजर चुकवून त्यांच्या पर्समधून सोन्याची चेन चोरून नेली.

या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रँचच्या अँटी चेन स्नॅचिंग पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी उषा डुंगो (४०, रा. रहाटेनगर टोली, अजनी) हिला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपी महिलेने चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी आरोपीला अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.