Published On : Thu, Oct 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अष्टपैलू कलाकाराला गमावले; नाना पाटेकर यांच्या निधनाने मोदी भावूक

Advertisement

अष्टपैलू कलाकाराला गमावले; नाना पाटेकर यांच्या निधनाने मोदी भावूक

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाने आपण एका असामान्य आणि अष्टपैलू कलाकाराला गमावले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि सामाजिक विषयांवरील परखड भूमिकेचाही मोदी यांनी विशेष उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात नाना पाटेकर यांच्या अभिनयातील वेगळेपणा, तीव्रता आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. नाना पाटेकर यांच्यासारखी तीव्रता, वेगळेपण आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व फार कमी कलाकारांकडे असते, असे मोदी यांनी म्हटले.

नाना पाटेकर यांनी साकारलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. प्रत्येक भूमिका त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून आणि सर्जनशीलतेने साकारली. त्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

मनातलं बोलण्यास कधीच घाबरले नाहीत-
नाना पाटेकर केवळ दमदार अभिनेता नव्हते, तर ते आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्त्या स्वभावासाठीही ओळखले जात होते. आपले मत व्यक्त करताना त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. सामाजिक प्रश्नांवरही ते सातत्याने आपली भूमिका मांडत असत, असे मोदी यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले.

Advertisement

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे सांगत मोदी यांनी त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या पोकळीचा उल्लेख केला.

७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास-
नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. डोना पावला येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर दिला. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीसह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. “त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती,” अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या श्रद्धांजलीचा समारोप केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.