
नागपूर :शहरातील क्राइम ब्रँचच्या पथकांनी बुधवारी मध्यरात्री कळमना परिसरात सुरू असलेल्या एका अवैध डान्स बारवर धडक कारवाई केली. शिवशक्ती बार या ठिकाणी करण्यात आलेल्या या छाप्यातून पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली असून त्यामध्ये एका महिलेसह दोन महिला बाहेरगावच्या, तर एक महिला पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अवैध व्यवसायाविषयी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे क्राइम ब्रँचच्या विविध युनिट्सनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या छाप्यात बार चालवणारे मुख्य आरोपी पप्पू यादव आणि त्याचा मुलगा दीप यादव यांना ताब्यात घेण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या महिलांना सध्या शासकीय निवारा गृहात हलविण्यात आले असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.पोलिस सूत्रांनी सांगितले की, शहरातील अशा अवैध बार आणि मानव तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी अशा प्रकारच्या मोहीमा पुढेही सुरू राहतील.